महाराष्ट्र सामाजिक

अयोध्या येथून आलेल्या पुजित अक्षद कलश यात्रेचे भव्य स्वागत

अयोध्या येथून आलेल्या पुजित अक्षद कलश यात्रेचे भव्य स्वागत

आज दिनांक 10 डिसेंबर 2023 रविवार रोजी सेलू येथे आलेल्या श्रीराम जन्मभूमि तिर्थ क्षेत्र नुतन मंदिर मध्ये श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा निमित्त अयोध्या येथून आलेल्या पुजित अक्षद कलश भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली सेलू येथिल विठ्ठल रुखमिणी मंदिर ते हरदूलाल मंदिर प्रभाग क्र.3 सेलू पर्यंत दिंडी सोहळ्याचे मोठ्या थाटात जल्लोशाने आयोजन करण्यात आले व भक्तिमय वातावरणात शेकडो भाविकांनी सहभाग घेतला तसेच अयोध्या वरुन आलेल्या पवित्र अश्या पुजित अक्षद कलश याचे दर्शन‌ करायचे सेलू वासियांना सौभाग्य लाभले तर हरदूलाल देवस्थान येथे मोठ्या भक्तिभावाने पूजित अक्षद कलश याची स्थापना करण्यात आली या पवित्र अश्या कार्यक्रमा चे आयोजक विश्व हिन्दू परीषद बजरंग दल, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ व वीर बजरंगी ग्रुप व ओम रा. टवलारे
सह सागर पोकळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Copyright ©