यवतमाळ सामाजिक

सुवर्णयुग क्रीडा मंडळ यवतमाळ राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा

सुवर्णयुग क्रीडा मंडळ यवतमाळ राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा

पुरुष गटात अमरावती शहर तर सब ज्युनिअर मुलांच्या गटात यवतमाळ जिल्ह्याला विजेतेपद
दिनांक ६ ते १० डिसेंबर २०२३ पर्यंत स्थानिक स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण येथे संपन्न झालेल्या आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ गटामध्ये अमरावती शहर संघाने अतिशय चुरशीच्या लढतीत वाशिम जिल्हा संघाचा पराभव करीत पुरुषांचे तर नागपूर शहर संघाने अमरावती शहर संघाचा पराभव करीत महिलांचे विजेतेपद प्राप्त केले.
यवतमाळच्या सुवर्ण क्रीडा मंडळ द्वारा आयोजित, हौशी कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ व हौशी कबड्डी असोसिएशन यवतमाळ जिल्हा यांच्या मार्गदर्शनात “स्वर्गीय नंदू पाटील स्मृती” राज्य कबड्डी स्पर्धेचा दिनांक १० डिसेंबरला समारोप झाला.
भव्य दिव्य स्टेडियम वर यवतमाळकरांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी मंत्री आमदार डॉ. अशोक उईके, विशुद्ध विद्यालय संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, विश्वस्त सुषमा दाते, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष क्रांती धोटे, नाना गाडबैले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
विजेत्यांना आकर्षक चषक बहाल करण्यात आले स्पर्धेदरम्यान यवतमाळचे आमदार माजी मंत्री मदन येरावार, खासदार हेमंत पाटील, विदर्भ कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, माजी कबड्डी खेळाडू प्यारेलाल पवार, तसेच अनेक आजी-माजी खेळाडूंनी, विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडांगणावर उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला.
स्पर्धेदरम्यान विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, राज्य कबड्डी संघाचे पदाधिकारी, पंच, आश्रयदाते, माजी राष्ट्रीय खेळाडू क्रीडा मार्गदर्शक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सामन्यांचे समालोचन प्रा. अजय कोलारकर यांनी केले तर विविध कार्यक्रमांचे संचालन अनंत पांडे यांनी केले.
*स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे*
पुरुष गट- प्रथम क्रमांक अमरावती शहर,
द्वितीय क्रमांक वाशिम जिल्हा तृतीय क्रमांक यवतमाळ जिल्हा व भंडारा जिल्हा
महिला गट- प्रथम नागपूर शहर, द्वितीय अमरावती शहर
तृतीय अकोला शहर व नागपूर ग्रामीण
सब ज्युनिअर मुले-
प्रथम यवतमाळ जिल्हा,
द्वितीय अमरावती शहर
तृतीय चंद्रपूर शहर व अमरावती ग्रामीण
सब ज्युनिअर मुली-
प्रथम अमरावती शहर,
द्वितीय नागपूर ग्रामीण
तृतीय भंडारा जिल्हा व वाशिम जिल्हा
सुवर्णयुग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अभय राऊत, सचिव अजय दंडे, व पदाधिकारी लालजी राऊत, नंदू वानखडे, विश्वनाथ झिंगे, अजय राऊत, संजय दांडगे, सुनील देठे, मोहन केळापुरे, सचिन ढोबळे, हेरंब पुंड, यशवंत मोकलकर व असंख्य कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम घेतले.

Copyright ©