महाराष्ट्र सामाजिक

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची त्वरित अंमलबजावणी करा

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची त्वरित अंमलबजावणी करा

जय संघर्ष संस्थेचा नागपुर विधान भवनावर मोर्चा 13 ला
वाहनचालकांनी मोठ्या संख्येने सभागी होण्याचे आवाहन
यवतमाळ: बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जय संघर्ष वाहनचालक, मालक संघटना १३ डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनात वाहनचालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यवतमाळ जिल्हा सचिव (प्रवासी विभाग) शेख सलमान, मिडीया प्रचार प्रसारक जिवन बोरकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. वाहनचालकांसाठी (स्व.) बाळासाहेब ठाकरे रस्ता अपघात योजनेची घोषणा करण्यात आली. याबाबत अध्यादेशही काढण्यात आला. मात्र शासनाचे दिशानिर्देश प्राप्त झाले नसल्याचे कारण पुढे करून अपघातातील जखमींना खासगी रुग्णालयात उपचार नाकारण्यात येत आहेत. वाहनचालकांसाठी आर्थिक महामंडळाचे राज्य शासनाने वारंवार घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात संघटनेने धडक मोर्चा नेवून निवेदन दिले होते. मात्र एक वर्ष उलटूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. वाहनचालकांसाठी आर्थिक महामंडळ स्थापन करावे, ई- चालनाच्या नावाने परिवहन अधिकान्यांकडून होणारी लूट त्वरीत थांबविण्यात यावी, येणाऱ्या सर्व प्रवासी वाहतूक वाहनांच्या प्रवासी क्षमतेत वाढ करावी, वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी कायदे करावेत, वाहनचालकांच्या पाल्यास विभाग स्तरावर वसतिगृह, मोफत शिक्षणाची सोय, बांधकाम मजुरास दिल्या जाणाऱ्या सुविधा, अपघाती मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये, शहराम मोफत घरे मिळावीत, ई चलान रद्द करावे, प्रत्येक टाेल नाक्यावर वाहन चालकांकरीता रेस्ट रूमची व्यवस्था करण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी नागपूर विधान भवनावर 13 डिसेंबर रोजी धडक मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये यवतमाळ येथील कार्यकारीणीचे पदाधिकारी जुबेर शेख, बाबु खान, सैय्यद रिजवान, राजा, संतोष राठोड, प्रितम दायरे, अनिल कालोकर, संतोष, तौहीद, आशिक शाह, भावेश बगमारे, मो.तौहीद, कमरान पठान, अमोल सानप, स्वप्नील भोरे, साजीद भाई, बंटी भाई, शाहरूख भाई, मुन्ना पठान, इम्रान मिर्झा आदि सहभागी होतील.

Copyright ©