Breaking News यवतमाळ

शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना जोडमोहा येथे घडली. लक्ष्मण वामन देवकर (५५, रा. जोडमोहा, ता. कळंब) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

लक्ष्मण देवकर यांची जोडमोहा जवळच श्रीकृष्ण टेकडी येथे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यावर बँकेचे ५० हजार रुपये कर्ज असल्याचे सांगितले जाते. यावर्षी उत्पादन झाले नसल्याने कर्जाची परतफेड करायची कशी, या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

Copyright ©