यवतमाळ सामाजिक

ग्रामपंचायत तेंडोळी “आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारा”ने सन्मानित

ग्रामपंचायत तेंडोळी “आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारा”ने सन्मानित

ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार 2024

स्पर्श सेवाभावी संस्था, वडारवाडी , अहमदनगर ही संस्था इ.स. सन 2016 पासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून “गौरव समाजाप्रती समर्पित कार्याचा” हे ब्रिद घेऊन समाजहित जोपासणाऱ्या विविध संस्था व व्यक्तिमत्व यांच्या कार्याची दखल घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करते यावर्षीच्या सन्मानासाठी आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तेंडोळी ग्रामपंचायतीची निवड होऊन या ग्रामपंचायतीस राज्यस्तरीय उपक्रमशील आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार 2024 असून व याच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार 2024 अहमदनगर येथील एका भव्य सोहळ्यात देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ग्रामपंचायत तेंडोळीने गेल्या दोन वर्षांमध्ये राबविलेले शासकीय, निमशासकीय आणि नाविन्यपूर्ण उपक्रम शिवाय पंधरावा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन या शासकीय योजनांची अंमलबजावणी, आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा, माझी वसुंधरा हे शासकीय उपक्रम तर बालकांसाठी “दिवसं तुझे हे फुलायचे”, तरुणांसाठी “तू नव्या जगाची आशा”, महिलांसाठी “घे भरारी” शेतकऱ्यांसाठी “रडणार नाही तर लढणार” अशा सर्वांगिण घटकांसाठी राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन या ग्रामपंचायतची एक उपक्रमशील आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आली.

तर ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक उपक्रमशील ग्रामसेवक म्हणून ओळखले जातात त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत गणगाव, वरुड भक्त येथे कार्यरत असतांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडात्मक, प्रबोधनात्मक विविध उपक्रम राबवून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार असे विविध पुरस्कार ग्रामपंचायतीस मिळवून दिलेले आहे. तर त्यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक, मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देखील यापूर्वी मिळालेला आहे. तर ते इयत्ता 10 वी ला असल्यापासून साहित्य क्षेत्रात असून ते आकाशवाणीसाठी व विविध वृत्तपत्रांसाठी स्तंभ लेखन, कथा लेखन करीत असून त्यांना यासाठी राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार 2021 सह अनेक छोटे-मोठे पुरस्कार प्राप्त आहेत. आज त्यांच्या या संपूर्ण उपक्रमशीलतेची दखल घेऊन त्यांना देखील प्रशासकीय सेवा पुरस्कार 2024 देण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा सिंधुताई सपकाळ यांच्या सुकन्या समाजसेविका ममता सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली तर सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र समाजसेवक विनयदादा सपकाळ, राहुरी विधानसभेचे आमदार प्राजक्तदादा तनपुरे, न्यास नोंदणी कार्यालय अहमदनगरच्या निरीक्षक सौ. रुपाली गीते, दैनिक दिव्य मराठी अहमदनगरचे वरिष्ठ उपसंपादक अनिलकुमार हिवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 20 जानेवारी 2024 ला सायंकाळी पाच वाजता आर्किड प्री-स्कूल क्रिडांगण, नागरदेवळे (भिंगार) तालुका जिल्हा अहमदनगर येथे पार पडला.

यावेळी पुरस्कार स्विकारण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ. सपना र.राठोड, उपसरपंच भगवान निकुरे, सदस्य परशराम राठोड, प्रल्हाद राठोड, संतोष आडे, सौ. विद्याताई कोलते, सौ सुनिता चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी जितेश चव्हाण उपस्थित होते.

यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ व ग्रामसेवक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©