यवतमाळ सामाजिक

आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी

आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी

तर सावकारी करणाऱ्याच्या घरी अधिकाऱ्या कडून तपासणी.

यवतमाळ, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता इसा सालेह अल गुर्ग, दुबई ही आस्थापना परिसर मुलाखतीकरीता उपस्थित राहणार आहे.

या आस्थापनेला इलेक्ट्रीशियन, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कन्डीशनर टेक्नीशियन या व्यवसायातील उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षाला प्रशिक्षण घेणारे उमेदवार पात्र आहेत.

पात्र उमेदवारांनी इंग्रजीतील कॉम्प्युटराईज्ड रिजूम, दहावी, बारावी गुणपत्रिका व टिसी, आयटीआय प्रमाणपत्र (एनटीसी), आधार कार्ड व पासपोर्ट फोटो प्रत्येकी दोन प्रतीमध्ये सोबत आणावे.

आस्थापनेमधील वेतन दरमहा एईडी ११५० राहणार आहे. आस्थापनेमार्फत विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामध्ये एप्लॉयमेन्ट व्हीसा, एअर तिकीट इन एव्हरी टु इअर्स. मेडीकल इन्सुरन्स, कॅम्प ॲकोमोडेशन, ट्रान्सोर्पोटेशन, एअर तिकीट फॉर फस्ट जॉयनिंग या सुविधांचा समावेश आहे

अधिक माहितीसाठी ए.व्ही. पिंगळे (जेएए), भ्रमणध्वनी ९४२३४३४७०३ यांचेशी संपर्क साधावा, पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी केले आहे.

—————————————

सावकरी पथकाकडून अवैध सावकारी करण्याऱ्यांच्या घरी झडती

यवतमाळ, दि. 29 नेर तालुक्यातील खळणा गावात जिल्हा निबंधक कार्यालयाच्या सावकारी पथकाने अवैध सावकारी करण्याऱ्यांच्या घरी झडतीची कार्यवाही २४ जानेवारी रोजी केली. या कार्यवाहीत आक्षेपार्ह ५३ कागदपत्रे,दस्तऐवज,कोरे धनादेश व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहे. ही कार्यवाही जिल्हा निबंधक यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

दि. २४ जानेवारी रोजी गैरअर्जदार अंकुश देवानंद घरडे व देवानंद अर्जुन घरडे दोन्ही रा. खळणा, ता. नेर, जि. यवतमाळ यांच्या राहत्या घरी सावकारी अधिनियमानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. अंकुश घरडे व देवानंद घरडे यांच्या विरुध्द पुणे येथील अर्जदार विनिता नंदकिशोर शहाडे यांचा तक्रार अर्ज विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती यांचेकडुन जिल्हा निबंधक, (सावकारी) यवतमाळ यांच्या कडे प्राप्त झालेला आहे.

या तक्रार अर्जानुसार अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रुपये १ लाख 50 हजार चार टक्के दराने सावकारी मध्ये घेतली होती, त्याबद्दल गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडुन वाद शेताचे नाममात्र खरेदीखत करुन दिले होते. गैरअर्जदार यांची सावकारी रक्कम रुपये १ लाख 50 हजार व त्यावरील चार टक्के व्याज परत केल्यानंतर गैरअर्जदार वाद शेताचे खरेदी खत अर्जदार यांच्या नावाने पलटुन देण्याचे ठरले होते. परंतु गैरअर्जदार यांनी शेती पलटुन दिली नसल्यामुळे सदरील खरेदी खत रद्द करण्यात यावे.

या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी सावकारी पथकाने गैरअर्जदार अंकुश देवानंद घरडे व देवानंद अर्जुन घरडे यांचे राहते घरी झडती घेतली. या कारवाई दरम्यान गैरअर्जदार यांचे घरातून संशयास्पद कोरा चेक्क, कोरा स्टॅप पेपर, खरेदी खत नोंदी असलेल्या डायऱ्या व हिशोबाच्या चिठ्ठया असे एकुण ५३ कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. या कागदपत्राची पडताळणी करुन सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.

ही कारवाई सावकारांचे जिल्हा निबंधक, तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांच्या नियोजनात सावकारी पथकातील पथक प्रमुख तथा सहाय्यक निबंधक बि. जी. जाधव, के.टी. खटारे, सहकार अधिकारी एम. एम. भगत, सहकार अधिकारी जी.पी.राठोड, एस.डी. सहकार अधिकारी श्रेणी-२, कळंब, चांदेकर, आर. डब्लु. टाके, आर.एन. नाईक, हनुमंत आठवले तसेच पोलीस प्रशासनातील के. आर. निन्सुरवाले, मनोज एस. गायकवाड, स्वाती सोळंके, रुपाली सयाम आणि पंच म्हणून तहसिल कार्यालयाचे एस. डी. राठोड, ए.एम. ठोकाडे हे सहभागी होते.

ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी, तथा अध्यक्ष जिल्हा सनियंत्रण समिती आणि जिल्हा पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहकार विभाग, महसुल विभाग आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी यांनी पार पाडले.

Copyright ©