यवतमाळ सामाजिक

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध रेतीला उत

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध रेतीला उत

यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या रुई परिसरात अवैध रेतीला उत् आला आहे.अर्थपूर्ण संबंधामुळे अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याची चर्चा रुई परिसरात जोमात सुरू आहे.कोणतेही रेती घाट हर्रास नसतांना शिवारात खुलेआम रेतीचे ढिगारे पहावयास मिळत आहे. रेती तस्करी करणाऱ्याला अभय कुणाचे असे अनेक प्रश्न या प्रकारामुळे निर्माण झाले आहे.रूई परिसरात अवैध रेतीचे तस्कर कोण,अवैध व्यवसाय कोण करतो याची माहिती पोलिस, महसूल प्रशासनाला आहे.परंतु करवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.या कर्मचाऱ्यांचा पगार शासन वेळेवर करत नसल्यामुळे यांना महिन्याचा लागणारा खर्च अवैध व्यवसाय कडून घेत आहे.अशी चर्चा गावकरी करत आहे.या व्यवसायावर शासनाची मान्यता असल्यागत खुलेआम सुरू आहे.यावर कोणाचाच वचक नसल्याचे चित्र सध्या रूई परिसरात पहावयास मिळत आहे रेतीचे भाव कडाडले असताना रेती तस्कर कोट्यावधी रूपये या अवैध धंद्यातून कमावीत आहे. जिल्ह्यात सर्वत्र याच भगातून रेतीचा पुरवठा केल्या जात असल्याचे समजते.विनापरवाना रेती उपसा केल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. या लाचखोर कर्मचाऱ्यावर शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावकरी करत आहे.

Copyright ©