काश्यपीने आष्टेडु आखाडा खेळ प्रकारात पटकावला विभागीय प्रथम क्रमांक
यवतमाळ येथील सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या काश्यपी विनोद दोंदल हिने दि. ८ फेब्रुवारीला अमरावती विभागाची क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती, अमरावती जिल्हा आष्टेडु आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने
अमरावती विभागीय शालेय स्तरीय मर्दानी खेळ
आष्टेडु आखाडा क्रीडा स्पर्धा २०२३-२४ बडनेरा जिल्हा अमरावती येथे घेण्यात आला, या स्पर्धेत यवतमाळ येथील सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये सातव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या काश्यपी विनोद दोंदल हिने शिवकला (लाठीकाठी) या खेळ प्रकारात १४ वर्षा आतील ३५ किलो वजन आतील गटात प्रथम क्रमांक पटकावला,
पुढे १२ फेब्रुवारी ला भांडारा जिल्ह्यातील तुमसर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रतियोगीते होणार आहे,
काश्यपी विजयाचे सम्पूर्ण श्रेय वडील विनोद दोंदल, आई कीर्ती दोंदल, विशेष आभार प्रशिक्षक प्रीतम सर सोनवणे यांना देत आहे त्याच बरोबर सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल चे संस्थापक मुख्याध्यापक दिनेश पवार सर, उपमुख्याध्यापक स्मिती देशमुख, वर्ग शिक्षिका निधी मॅम, क्रीडा शिक्षक प्रतीकसर खुजे, सागरसर रेकवार, रजत सर कडू इत्यादी शिक्षक वृंद वेळोवेळी मार्गदर्शन करीन सहकार्य करीत राहतात, काश्यपी सोबत शिवकालीन मर्दानी कलेचे अभ्यास घेणारे सर्व सवंगडी मुले-मुली सहकार्य करत असतात, काश्यपीने मिळवलेल्या नाविन्यपूर्ण यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे ..
Add Comment