यवतमाळ शैक्षणिक

गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विविध खेळांमध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

तालुक्यातील जवळा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे 10 फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला व विविध खेळांमध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी गुरुकुल इंग्लिश स्कूल व ठाकूर येजुकेशन यांच्या वतीने 20 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत विविध स्पर्धा घेतल्या जातात व या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याला प्रोत्साहन म्हणून विविध बक्षीस दिले जाते व शेवटी नृत्य सादर करून या उपक्रमाची सांगता करण्यात येते त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळते व अगदी नर्सरी पासून तर वर्ग चौथी मधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेतात. काल झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये “आमच्या पप्पाने गणपती आणला”या गीतावर चिमुकल्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली या सांस्कृतिक कार्यक्रमाला अध्यक्ष गोविंदराव भिसे,प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापिका काकड़े श्रीनिवास येरावर,गावंडे मॅडम,गजानन भगत,महादेव लोखंडे,दत्ता तडसे गावातील मंडळी व सर्व पालक उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी प्रा. जोतीपाल देशपांडे,अनिस सोलंकी,शारुख सोलंकी,शेख रज्जाक,साक्षी काटकर, मीनाक्षी गावंडे,पल्लवी रामजिरकर,अश्विनी शिकारे,अश्विनी काळे यांनी परिश्रम घेतले.

ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत ठीकावे

आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त नोकरीच नाही तर विविध कला मुळे विद्यार्थी पुढे जातात यात आपल्याला जास्त करून शहरातील विद्यार्थी पुढे जाताना दिसतात म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत ठीकावा विविध कला गुणांच्या स्पर्धेत शहराच्या तुलनेत टिकाव व विद्यार्थ्यांना भरभरून यश प्राप्त व्हावे हाच उद्देश ठेवून ठाकूर ग्रुप ऑफ येजुकेशन व गुरुकुल इंग्लिश स्कूल यांच्या वतीने २० जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत विविध स्पर्धा घेऊन मुलांचा आत्मविश्वास वाढविला जातो यामागील मुख्य उद्देश म्हणजे स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील मुले सक्षम असावीत असा ठाकूर ग्रुप ऑफ येजुकेशन चा प्रयत्न आहे.

Copyright ©