यवतमाळ राजकीय

लकी छांगाणी यांचा मित्र परिवारासह महाराष्ट्र निर्माण सेनेत प्रवेश

लकी छांगाणी यांचा मित्र परिवारासह महाराष्ट्र निर्माण सेनेत प्रवेश

जिल्हा मनसेचे नेते अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त करत प्रवेश… यवतमाळ शहरातील युवा वर्गात सुपरीचीत लकी छांगाणी यांनी माननीय राज साहेब ठाकरे, युवा हृदय सम्राट अमित साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होत मनविसे चे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ हमदापुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मनसे शिवाय पर्याय नाही हा विश्वास व्यक्त करत शहरातील प्रसिद्ध उद्योजक ,व्यापारी, प्राध्यापक व आपल्या सर्व समर्थकासह मनसेत प्रवेश करण्यात आला. या प्रवेशानंतर यवतमाळ शहरासह यवतमाळ विधानसभेत नवयुवकांचा कल हा मनसेकडे राहील आणि भविष्यात यवतमाळ विधानसभेचे भवितव्य ठरवेल अशा प्रकारची प्रतिक्रिया मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ हमदापुरे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रामुख्याने चेतन ठोंबरे , गौरव खिवसरा, सुदर्शन शिंदे पाटील, राहुल शर्मा ,डॉ. सागर गड्डमवार ,रोहन खंदाडे ,मयूर कारंजकर ,प्रकाश बर्डे ,विजय मिरकुटे अनिकेत मिठे , अविनाश खंदाडे,विकास श्रीवास ,धवल बिलखिया ,अमोल पोहरे, हर्ष भुतडा ,अनिल चुरा ,देवाशीष शर्मा ,जय चौधरी, यश कट्यारमल, अमोल ठाकरे ,राहुल मोहता ,महेश डोळसे, यासह शहरातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. याप्रसंगी प्रामुख्याने मनसेचे दीपक आडे, गौरव दरणे ,ओम राठोड, आक्रोश पवार, सौरभ अनसिंगकर,यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©