यवतमाळ शैक्षणिक

कू.प्राची चव्हाण विद्यालयातून प्रथम

कू.प्राची चव्हाण विद्यालयातून प्रथम

कै. वसंतराव नाईक विद्यालय सावळी सदोबा यांचे वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने कला क्रीडा सांस्कृतिक व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या सौ.शारदा बाळासाहेब शिंदे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्री बाळासाहेब देवराव शिंदे हे होते या स्पर्धेत इयत्ता दहावी तील विद्यार्थिनी कु. प्राची जयदीप चव्हाण रा.माळेगाव तह. आर्णी हिने हस्ताक्षर स्पर्धा व स्वयंशासन स्कूल डे या दोन स्पर्धेत भाग घेतला होता व दोन्ही स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळविला या यशाचे श्रेय ती मुख्याध्यापिका शरयू वाघमोडे मॅडम व इतर गुरुजनांना देते कु. प्राची ही ज्येष्ठ कलावंत सुनील चव्हाण यांची पुतणी आहे.संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©