यवतमाळ सामाजिक

शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री पीक कर्जावर द्यावे लागेल सहा टक्के व्याज!

शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री पीक कर्जावर द्यावे लागेल सहा टक्के व्याज!

सावळी सदोबा शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेला नावलौकिक प्राप्त झाला आहे. मात्र चालू हंगामातील पीक कर्ज भरताना शेतकरी सभासदांना सहा टक्के व्याजदराने पीक कर्ज भरावे लागणार आहे. सदरच्या सुचना सहकार आयुक्तांनी ‘विसी’ च्या माध्यमातून बँकांना दिले. दोनच दिवसात जिल्हा बँकेने सदर सुचना सर्व बँक व्यवस्थापकांनी सहसचिवांना दिल्या आहे. त्यामुळे सदर आदेशाप्रती शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची कैवारी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ओळखले जाते. सदर बँकेचे जाळे जिल्हाभर पसरलेले आहे. या बँकेच्या जिल्ह्यात 95 शाखा कार्यरत असून शाखेंतर्गत 930 च्या आसपास विविध सहकारी सोसायटीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना पीक कर्ज दरवर्षाला वाटप केले जाते.नाबार्ड मार्फत शेतकऱ्यांना सुखी ,समृद्धी ,संपन्न होण्याकरिता बिनव्याजी पीक कर्ज बँकेच्या माध्यमातून वाटप केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा आधार आहे. मात्र नुकताच सहकार आयुक्त यांनी ‘विसी’ च्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकांना सूचना दिल्या आहेत. यात सन 2023 – 24 च्या मुदतीत कर्ज परतफेडचे निकषावर केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या तीन टक्के व्याज परतावा व डॉ पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेअंतर्गत प्राप्त होणारा तीन टक्के व्याज परताव्याचे प्रस्ताव केंद्र शासनाने किसान रूल पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहे.

त्याचं बरोबर त्यामुळे सहकारी सोसायटीने चालू हंगामातील पीक कर्ज वसूल करताना शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना सवलत न देता सहा टक्के प्रमाणे व्याजाची रक्कम वसुलीचे सूचना दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कर्जावर सहा टक्के प्रमाणे व्याज भरावे लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये कृषी प्रधान देशाच्या पोशिंद्यावर या आदेशाप्रती प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.

सहकार आयुक्तांचे आदेश.. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी अन संताप

Copyright ©