यवतमाळ सामाजिक

आर्णी येथे रमजान ईद साजरी

आर्णी प्रतिनिधी सैय्यद अक्रम 

आर्णी येथे रमजान ईद साजरी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान ईद साजरी करण्यात आली रमजानचा पवित्र महिना हा मुस्लिम धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि महिन्याच्या शेवटी ईद साजरी करण्यात येते आणि ही ईद सर्व मुस्लिम बांधव सर्वधर्मसमभावाने साजरी करतात तसेच आर्णी शहरात बाबा कंबलपोष दर्गा येथे ईदगाहवर नमाज करतात. ईद साजरी करताना आर्णी शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार साहेब सर्व मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त करतात अशातच याही वर्षी ठाणेदार केशव ठाकरे यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले व रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे मौलाना हसन मिसबाही यांचे विशेष स्वागत केले व लहान मुलांना सुद्धा गुलाबाचे फुल देऊन त्यांचे मनोगत वाढविले आर्णी शहर हे पूर्वीपासूनच एकोप्याने आणि आनंदाने ईद साजरी करतात रमजान ईद निमित्त काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांचे चिरंजीव मानस सुरेश धानोरकर यांनी विशेष हजेरी लावून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे मोठ्या आनंदात आणि उत्साहात ईद साजरी करण्यात आली.

Copyright ©