Breaking News यवतमाळ

पैनगंगा नदीत काकुसह दोन पुतणीचा बुडून मृत्यू, आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथील ह्रुदयदायक घटणा तालुक्यात शोककळा

आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम 

पैनगंगा नदीत काकुसह दोन पुतणीचा बुडून मृत्यू, आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथील ह्रुदयदायक घटणा तालुक्यात शोककळा

आर्णी:- लोकसभा निवडणूकीची जिल्ह्यात धामधूम सुरू असतानाच आर्णी तालुक्यात एक दुःखद घटना घडल्याचे समोर आले. आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथील एक महिला पूजेतील निर्माल्य विसर्जनाच्या साठी गावा कठीण पैनगंगा नदीवर गेल्या त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील दोन पुतण्या चिमुकल्या देखील होत्या दरम्यान एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडली तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी देखील डोहात बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली पण त्याही डोहात बुडाल्या या घटने नंतर गावकऱ्यांनी नदी पात्रा कडे धाव घेतली पण व्यर्थ तिघींचे मृतदेहच वर आले.

या घटनेमुळे आर्णी तालुक्यातील कवठाबाजार सह तालुक्यावर शोककळा पसरली व सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त होत आहे. नदी पत्रातील बेसुमार उपसा या घटनेस कारणीभूत असल्याचे बोलले जाते यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

प्रतीक्षा प्रवीणचौधरी वय अंदाजे ३५ वर्ष कु. अक्षरा निलेश चौधरी १२ वर्ष कु. आराध्य निलेश चौधरी ११ वर्ष अशी मृतकांची नावे असल्याचे कळते यामुळे संतप्त गावकऱ्यांनी नदी पात्रात ठिय्या दिला

Copyright ©