Breaking News यवतमाळ

कर्जाच्या डोगंरामुळे शेतकरी पति पत्नीची विहीरत उडी मारुन आत्महत्या

आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम 

कर्जाच्या डोगंरामुळे शेतकरी पति पत्नीची विहीरत उडी मारुन आत्महत्या

दिग्रस तालुक्यातील डेहणी येथिल ह्रदयदायक घटणा

आर्णी :- काल आर्णी येथिल घटणेमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाल्या नंतर आज दिग्रस तालुक्यातील आर्णी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डेहणी येथे किशोर नाटकर व वनिता नाटकर या पतीपत्नी कर्ज झाल्याने संगनमताने डेहणी येथिल पाणी पुरवठा होत असलेल्या विहीरीत सकाळी ७ वाजताच्या दर्म्यान आत्महत्या केल्याची माहीती प्राप्त झाली आहे हे पती पत्नी सकाळीच ७ वाजताच्या दर्म्यान आपल्या शेतातील प-हाटी उपटण्यासाठी घरुन निघुन गेले वाटेतच वामन दिघ्घलवार यांचे शेत असुन त्यांचे विहीरीवरुनच डेहणी गावाला पाणी पुरवठा होत असल्याने ग्रा प कर्मचारी श्रीकांत नाटकर हे सकाळी १० वाजताच्या दर्म्यान पाणी पुरवठा विहीरीकडे आले असता त्यांना दोन मृतदेह विहीरीत तरंगत असल्याचे दिसले असता सदर बातमी गावात वा-हासारखी पसरली असता विहीरीकडे एकच गर्दी दिसुन आल्याने लगेच आर्णी पोलीसांना पाचारण करण्यात आले असता पोलिसांनी दोन्ही मृतदेह गावक-यांच्या मदतीने बाहेर काढुन पंचनामा केला असता सदर मृतक किशोर नाटकर वय ४५ वर्ष हा आपली डेहणी येथील स्व:ताची शेती वहीत करीत असुन गेल्या दोन वर्षापासुन सततची नापकी होत असल्याने त्यावर कर्जाचा डोंगर पसला असल्याने तो नेहमीच विवनचनेत राहात असल्याने शेवटी आत्महत्ये करण्याचे ठरवत त्याने आपल्या माघारी पत्नीचे काय?हा विचार करुन शेवटी दोघान्ही आत्महत्या केल्याने संपुर्ण डेहणी गावात शोककळा पसरली आहे सदर प्रकरणी आर्णी पोलीसात गुन्हा दाखल होऊन पुढील तपास आर्णी पोलीस करीत आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©