Breaking News यवतमाळ

कवठाबाजर येथिल पैनगंगा नदीपात्रात बुडुन मृत्यृ पावलेल्या काकु व दोन सख्या बहीणीच्या मृत्यृ प्रकरणी वाळु कंत्राटकदार व प्रशासनातील दोषी असलेल्या कर्मचा-यावर पोलिसात गुन्हा दाखल

आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम 

कवठाबाजर येथिल पैनगंगा नदीपात्रात बुडुन मृत्यृ पावलेल्या काकु व दोन सख्या बहीणीच्या मृत्यृ प्रकरणी वाळु कंत्राटकदार व प्रशासनातील दोषी असलेल्या कर्मचा-यावर पोलिसात गुन्हा दाखल

गावक-यांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय मृताचा पंचनामा करण्यास केला होता विरोध

रात्रभर तिन्ही मृतदेह नदी पात्रातच

महसुल व पोलिस प्रशासनातील अधिका-यांनी गावक-यांची काढली समजुत

गुन्हा दाखल केल्याने तिन्ही मृतदेहाचे झाले शवविच्छेदन

आर्णी:- काल सायकाळी ५ वाजताच्या सुमारास कवठा बाजार येथिल चौधरी कुटुंबातील तिन मुली व दोन जावा काल शनीवार असल्याने देवघरातील निर्माल्य विसरजनासाठी गावा शेजारीच असलेल्या पैनगंगा नदीपात्रात पोहचल्या धुणे धुण्याच्या गोट्यावर निर्माल्य विसरजन करतांनाच कु आराध्या चौधरी हिचा पाय घसरुन पडताच तिला वाचविण्यासाठी कु अक्षरा निलेश चौधरी व काकु प्रतिक्षा प्रविन चौधरी यांनी तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली त्याही पाण्यात बुडत असल्याचे पाहुन जाऊबाई जया निलेश चौधरी व रेणु निलेश चौधरी यांनी देखील पाण्यात उडी मारली परंतु त्या खोलपाण्यातुन सुखरुप बाहेर पडल्या मग या दोघंणी तेथुनच गावातील मंडळींना हाख देत तेव्हा पर्यंत या तिघी ही मृत्यृमुखी पडल्या सदर घटणे मुळे संपुर्ण गावातच नव्हे तर संपुर्ण तालुक्यात शोककळी पसरली त्या तिघाचांही मृतदेह बाहेर काढल्यानंतर अख्या गावाने महसुल व खनिकर्म विभागाला धारेवर धरले सदर गावाने येथिल रेतीघाट प्रशासनाला लिलाव करण्यापासुन रोखले होतो तरी प्रशासनाने कवठा बाजार येथिल गावक-यांचे मत न जाणुन घेता सदरचा रेती घाट डेपो लिलाव केला सदर रेती घाट डेपोचा लिलाव यवतमाळ येथिल महम्मद असिम अंन्सारी यांनी वाळु नियमांची पायमल्ली करत या रेती घाटावरुन मोठ्या प्रमाणात ट्रेझर बोट,जेशिबी मशिनच्या सहाय्याने पैनगंगा नदी पात्रात मोठ मोठाले खड्डे करुन रेतीचा बेसुमार उपसा केला जिथे जिवित हाणी झाली तेथे ५० ते ६० फुट खड्डा पडला तेव्हा यावर नियंत्रण प्रशासनाचे अधिनस्त असलेल्या कर्मचा-यांनी संगनमत करुन संपुर्ण नदी पात्रात मोठमोठे खड्डे होत असतांना जाणिव पुर्वक दुर्लक्ष केल्यांने संमधित कर्मचा-यानवर ३०४ व ३४ नुसार आर्णी पोलिसात रितसर गुन्हा दाखल करुन पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे व दारव्हा येथिल पोलिस उपविभागिय अधिकारी रजनीकांत चुलुमुला यांनी झालेल्या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करुन गावक-यांच्या भावना समजुन घेत रितसर गुन्हा दाखल झाल्याने गावक-यांनी पोलिस प्रशासनास लगेच सहकार्य करुन तिन्ही मृतदेह रविवार दिनांक १४ ला शवविच्छादनासाठी आर्णी येथे आणण्यात आले .

Copyright ©