महाराष्ट्र सामाजिक

आझाद नारी फाउंडेशन द्वारा आयोजित ग्रंथ दिंडी व व्याख्यानमाला उत्साहात संपन्न!

आझाद नारी फाउंडेशन द्वारा आयोजित ग्रंथ दिंडी व व्याख्यानमाला उत्साहात संपन्न!

क्रांतीसूर्य महात्मा जोतीरावजी फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित भव्य ग्रंथ दिंडी व व्याख्यानमाला बोरी अडगाव येथे दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल रोजी संपन्न. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शतकानुशतकाच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून पिढ्या-पिढ्यांसाठी एक ऊर्जादायी केंद्र आहेत महात्मा फुलेंनी शिक्षणाची बीज रोवली म्हणूनच इथला उपेक्षित वंचित बहुजन समाज हा माणसांमध्ये आला त्याला माणूसपणाची वागणूक मिळाली असे डॉक्टर संतोष हटकर यांनी व्यक्त केले आझाद नारी फाउंडेशन यांच्याद्वारे आयोजित ग्रंथ दिंडी व व्याख्यानमाला कार्यक्रमाला बोलत असताना त्यांनी सांगितले. सोबतच राहुल सुरवाडे यांनी कार्यक्रम घेण्यामागील भुमिका विशद केली त्यांनी सांगितले विचारांचा वारसा जपला पाहिजे जल्लोष जयंतीचा पण महोत्सव विचारांचा असला पाहिजे अशी आमची भुमिका असून सर्वधर्म समभाव यामध्ये बघायला मिळतो लोकांमध्ये प्रबोधन व परिवर्तन होत असुन हा एक चांगला संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावांमध्ये रुजत असल्याचे चित्र आपल्याला दिसते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर करंगाळे कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख उपस्थिती बाजारभाव अभ्यासक पुरुषोत्तम भाऊ मेतकर सुभाष सुरवाडे काशीराम ठाकरे राधेश्याम ठाकरे बाळू बगाडे जगन्नाथ खंडारे भाई पांडुरंग कीर्तने निलेश सुरवाडे , मानव सुरवाडे इंदूबाई सुरवाडे , शशिकला ताई, व मोठ्या संख्येने उपस्थित होते पिढ्यानपिढ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदरील कार्यक्रमाची विशेषतः म्हणजे सामाजिक एकोप्याचं दर्शन ह्या कार्यक्रमातून दिसुन आलं.! सूत्रसंचालन, राहुल सुरवाडे यांनी केलं तर आभार भाई कीर्तने यांनी केले.

Copyright ©