यवतमाळ सामाजिक

मुख्याध्यापक शरद ठोंबरे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

मुख्याध्यापक शरद ठोंबरे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

मविप्र संचलित जनता विद्यालय वडाळीभोईचे मुख्याध्यापक शरद ठोंबरे यांचा सेवापुर्ती सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. ते ३० एप्रिल रोजी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने मुख्याध्यापक ए पी मते यांनी सत्कारमूर्ती शरद ठोंबरे यांचा पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार केला. व्यासपीठावर शालेय समितीचे पदाधिकारी, पर्यवेक्षक एच जी कुंभार्डे उपस्थित होते. कार्यक्रमास पिंपळगाव बसवंत, वडनेर भैरवचे प्रतिष्ठित नागरिक, आप्तेष्ट, नातेवाईक, सगेसोयरे, हितचिंतक, मित्रमंडळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Copyright ©