यवतमाळ सामाजिक

पाण्याची समस्या ताबडतोब निकाली काढावी डॉ प्रा मिनाक्षि सावळकर

पाण्याची समस्या ताबडतोब निकाली काढावी डॉ प्रा मिनाक्षि सावळकर

(‌ स्थानिक प्रतिनिधी) दि 7/5/2024 यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. पण शासनाला अद्याप पावे तर जाग आलेलेली नाही ,महिला सकाळी चार वाजता पासून पाणी भरण्यासाठी चार किलोमीटर दूरवर जातात आणि घरच्या पाण्याची व्यवस्था करतात पण शासन स्तरावर कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. गेली अनेक वर्षापासून उमरखेड तालुक्यामध्ये 15 गाव अशी आहे. ती ज्या गावांमध्ये पाण्याचा पुरवठा उन्हाळ्यामध्ये तीन/चार महिने नसतात पण शासनाने अद्याप पावतो ठोस निर्णय घेतलेला नाही, म्हणून आज माननीय ,जिल्हाधिकारी साहेब .

यवतमाळ . यांना निवेदन देण्यात आले निवेदन डॉ प्रा मीनाक्षी अमृतराव सावळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य तथा पीसीसी मेंबर महागाव आणि विभागीय अध्यक्ष निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग‌ उमरखेड , यांच्या नेतृत्वात खाली ‌‌उमरखेड तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात ‌निवेदन देण्यात आले की,गेली अनेक वर्षापासून उन्हाळ्यामध्ये आमच्या महिलांना पाणी भरण्यासाठी चार , किलोमीटर दूरवर जावे लागते पण अद्याप पावतो शासनाने महिलांच्या होत ,असलेल्या, त्रासा बाबात कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आज उमरखेड तालुक्यामध्ये साखरा, खरुज, लोहरा ,कारखेड ,दिगडी ,देवसरी, उंचवड, चातारी, कोपरा, बोरी, माणकेश्वर, सिंगी, सावळेश्वर, गांजेगाव ,या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई असून मानवाला पाण्याची समस्या निर्माण झाली. तसेच जनावरांच्या पाणी पिण्याची समस्या निर्माण झाली. महिलांना होणाऱ्या त्रासा बाबत शासनाला कधी जाग येईल हे अद्याप कळले नाही. गेली दोन महिन्यापासून आमच्या महिला चार किलोमीटर दूरवर जाऊन पाणी भरत आहे. अन्न, वस्त्र, निवारा ,या तीन मूलभूत गरजा मानवाच्या असून पाण्यापासून मानव जास्त दिवस वाचू शकत नाही .याची शासनाला कधी जाण होईल हे कळत नाही. या गावात पाणीटंचाईचे मोठे संकट आवासुन उभे आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब आपणास नम्र विनंती ताबडतोब या लोकांना नळाची किंवा ,शासकीय टँकर नी पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी, ही नम्र विनंती महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यामार्फत गेली अनेक वर्षापासून जलजीवन मिशन हा प्रोजेक्ट चालू आहे. आपण महाराष्ट्र शासनाच्या अनेक जलजीवण मिशनच्या भ्रमध्वनी वरून आणि टीव्हीवरून माहिती प्रसारित करतात पण सत्यता वेगळीच जाणून येत आहे. असे कशे हा प्रश्न जनतेला पडलेला आहे? त्यामुळे जनतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही विनंती पूर्वक अर्ज सादर करीत आहोत, जर *दहा दिवसाच्या आत पाण्याची समस्येचे निवारण न झाल्यास आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार* तरी समस्येचे निवारण करण्यासाठी आम्ही आपणास निवेदन सादर करीत आहोत आपली, नम्र डॉ प्रा मिनाक्षि सावळकर उमरखेड, विद्या पाताल बन्सी जिल्हाध्यक्ष निराधार निराश्रीत व्यक्त विकास विभाग सरस्वती ठाकूर जिल्हा सचिव निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग सुमन ताई चव्हाण निराधार निराश्रीत व्यक्तिविकास विभाग उपाध्यक्ष शीलाताई पवार निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग सचिव रंजना ताई गोगटे सदस्य मयुरी नेवारे अंजली चिलोरकर ही बातमी आपल्या दैनिक वृत्तपत्रामध्ये छापावी ही नम्र विनंती. कारण हा महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे

Copyright ©