Breaking News यवतमाळ

अज्ञात इसमाने येळाबारा शेत शिवारात अडीच एकर मधील तीळ पेटविला

अज्ञात इसमाने येळाबारा शेत शिवारात अडीच एकर मधील तीळ पेटविला

शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान

अकोला बाजार :- वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येळाबारा येथील प्रफुल सुभाष पाईकराव रा. येळाबारा यांनी शेतात अडीच एकर उन्हाळी तीळ या पिकाची लागवड केली होती.तीळ पीक हे काढणी योग्य झाल्याने त्यांनी पिकाची कापणी करून  शेतातच गंजी लावून ठेवली होती.हवामान विभागाने तीन चार दिवस पाऊस सांगितल्याने त्यांनी आपली गंजी ताडपत्रीने झाकून ठेवली होती.घटनेच्या अगोदरल्या दिवशी म्हणजे 10 मे च्या रात्री घरी जाते वेळी गंजी जैसे थे होती., परंतु शनिवार दिनांक 11 मे रोजी सकाळी प्रफुल पाईकराव हे शेतात गेले असता संपूर्ण तीळ पिकाच्या गंजीची राख झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले ऐन पेरणीच्या तोंडावर गरीब शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सदर फिर्यादी प्रफुल पाईकराव हे  तात्काळ वडगाव पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार दिली असता वडगाव पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध कलम 435 भा द वी चा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

Copyright ©