यवतमाळ सामाजिक

बोरी येथील राजीव नगरमध्ये – ३३केवव्ही रोहीत्रामुळे मोठा अपघात – सुदैवाने जीवितहानी टळली

बोरी येथील राजीव नगरमध्ये – ३३केवव्ही रोहीत्रामुळे मोठा अपघात – सुदैवाने जीवितहानी टळली

काल रात्री राजीव नगरमध्ये घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात येईल तसा पाठपुरावा मी स्वताला जातीने लक्ष घालून करेल…

संतोष ढवळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

आशिष सावंकार- प्रतिनिधी – बोरी अरब येथील राजू नगर वार्ड नंबर चार मध्ये 33 केव्ही रोहित्र अगदी गावातून गेल्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांचा जीव सातत्याने धोक्यात राहत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत असून याआधी सुद्धा मोठा अपघात घडला .यात एक व्यक्ती विद्युत प्रवाहाला छेदून उल्कापाताने जळून खाक झाली होती ..

काल रात्रीसुद्धा रात्री अडीचच्या सुमारास 33 केव्ही रोहित्रमुळे तार मोठ्या प्रमाणात उल्कापात होऊन त्या आजूबाजूच्या असलेल्या दहा घरांमध्ये तार तुटल्याने जिवंत करंट होता .त्यामुळे अक्षरशा काही लोकांना विद्युत प्रवाहाचा झटका लागला.. ‌‌ या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करावी यासंदर्भात वरिष्ठांनी लक्ष घालावे.अन्यधा आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.. यावेळी शिवसेनेचे आशिष सावंकार, राजीव गुप्ता, इक्मोद्दीन काजी, शेख जलील , संतोष वानखेडे, कैलास भेंडे, जाकीर शेख, बबलू शेख,तथा सौ भेंडे.सौ वानखेडे तथा ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणात होते.

सर्वांनी आपबिती परिस्थितीची माहिती यवतमाळ जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांना दिली यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे त्यांनी दूरध्वनीवरून सर्वांना सांगितले.

Copyright ©