Breaking News यवतमाळ

पैशाच्या वादातून तरुणाचा खुन 

प्रतिनिधी: प्रवीण राठोड

पैशाच्या वादातून तरुणाचा खुन 

अकोला बाजार : पैसे देवाण घेवाणच्या वादातून एका तरुणाचा खुन झाल्याची घटना वडगाव पोलीस ठाण्यातर्गत वरुड येथे गुरुवारी दुपारी घडली. प्रफुल अशोक झाडे (30) रा. वरुड असे मृतकाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजीव खंदारे , जमादार धनंजय शेखदार , नीलकमल भोसले यांनी मृतकचे घरी घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणी करीता यवतमाळ येथे रवाना केले. पोलीस उपविभागीय अधिकार बैसाणे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या खुन प्रकरणी गावातील तीन आरोपीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या संशयितसोबत पैशाच्या कारणावरून प्रफुलचा वाद झाल्याचे सांगण्यात येते. वडगाव पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे. अद्याप पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली नाही.

Copyright ©