यवतमाळ शैक्षणिक

कु. रुद्रायिनी संजय पवारचे ९७.६०% गुण मिळवून सिबीएसई परीक्षेत सुयश

कु. रुद्रायिनी संजय पवारचे ९७.६०% गुण मिळवून सिबीएसई परीक्षेत सुयश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सिबीएसई) घेण्यात आलेल्या दहाविच्या परिक्षेत कु. रुद्रायिनी संजय पवार या सेंट अलोयसिस शाळेच्या विद्यार्थीनीने ९७.६०% गुण मिळवत शाळेतुन प्रथम येत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. विशेष म्हणजे रुद्रायिनीने गणित व संस्कृत विषयात १०० पैकी १०० तर सोशल सायंन्स मध्ये १०० पैकी ९९ , सायंन्स ९५ व ईग्लिश ९४ गुण कोणत्याही शिकवणीशिवाय प्राप्त केले. या घवघवीत

यशाचे श्रेय ती आईवडील , शिक्षकांना देते. कॅालेज कट्टा गृप व पिटीए यवतमाळ परिवाराने रुद्रायिनीने प्राप्त केलेल्या यशाबद्दल कौतुक व अभिनंदन करून भावी आयुष्या करीता हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Copyright ©