Breaking News यवतमाळ

वादळी वार्‍याचा वडगाव(जं) ठाण्याला फटका

वादळी वार्‍याचा वडगाव(जं) ठाण्याला फटका

छप्परसहित टीनपत्रे उडाली,ठाण्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी संगणक कक्षासह आणि महत्त्वाचे कागदपत्रे पाण्यात भिजली.

जनतेची सुरक्षा करणारेच असुरक्षिततेच्या छायेत, छप्पर उडाले.

अकोला बाजार : यवतमाळ तालुक्यातील वडगाव जंगल येथे गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार आगमन केले.आणि याचा फटका वडगाव जंगल पोलिस स्टेशनला बसला. यात ठाण्याच्या इमारतीचे मोठे नुकसान होत वरील छप्परसह टीन पत्रे उडाली.तर ठाण्याच्या इमारतीच्या आत पाणीच पाणी शिरले.परिणामी सर्व महत्त्वाचे कागदपत्रे पाण्यामध्ये भिजल्या गेले. संगणक आणि सिसिट्युव कॅमेरे यांचे सुद्धा नुकसान झाले. ठाण्यात पाण्याचे डबके साचल्याने आणि पोलीस बांधवांची पावसाच्या पाण्यापासून आडोसा घ्यायला एकच तारांबळ उडाली.बाजूला असलेले टिनाचे शेड सुध्दा उडाले.सुदैवाने यात कोणतीच जिवितहानी झाली नाही. सदर परिस्थितीची पाहणी करत यवतमाळ पोलिस विभागीय अधिकारी दिनेश बैसाणे, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांनी वडगाव जंगल पोलिस ठाण्याला भेट देत आढावा घेतला.

आजच्या परिस्थितीला वडगाव जंगल ठाण्याची इमारत ही ब्रिटिश कालीन असून या इमारतीची वेळ प्रसंगीच मरम्मत केली जाते.दैनिक दिव्य मराठीने मागील काही दिवसा आधी दोन ते तीन वेळा पोलिस बांधवांचा सुरक्षेचा प्रश्न, इमारतीच्या ढासळलेल्या भिंती, तसेच येथे इमारतीत सतत निघणारे विषारी साप याविषयी अनेक व्यथा मांडून पोलिसांचे,इमारतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणून बातमीतून प्रकाशित केला होता.

परंतु प्रशासनाने अजूनपर्यंत या प्रश्नावर डोळेझाक करत कानावर हात झाकून ठेवले आहे. ठाण्याच्या नवीन इमारती विषयी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात कार्यरत असणार्‍या बांधवाविषयी कोणतीही आपुलकीची भावना निर्माण केली नाही आणि ठाण्यात असणार्‍या पोलिस बांधवांची व्यथा समजून घेतल्या नाही. पोलिस बांधव हा आम जनतेचे सुरक्षक परंतु तेच हल्ली असुरक्षित छत्र छायेत वावरताना आणि आपले कर्तव्य पार पाडत असतांना दिसते आहे. एखाद्यावेळी,एखाद्या पोलिस बांधवांचा जीव जाईल तेव्हाच या प्रशासनाला जाग येईल का? तेव्हाच प्रशासन ठोस निर्णय घेईल का? कधी दिल्या जाईल पोलिस बांधवाना सुरक्षेतेची हमी असा प्रश्न पोलिस बांधवांसहीत सामान्य व्यक्तीला निर्माण आहे.

Copyright ©