Breaking News यवतमाळ

खत घेऊन जाणारा ट्रक पलटी 

प्रतिनिधी अकोला बाजार प्रवीण राठोड

खत घेऊन जाणारा ट्रक पलटी 

नांदेडहुन घाटंजीला जाणारा खताचा ट्रक अकोला बाजार घाटंजी रोड वरील वळणार पलटी झाल्याची घटना शनिवारी घडली. हल्ली काही दिवसावर येऊन ठेपलेला पाऊस आणि त्या अनुषंगाने शेतकर्‍यांच्या मागणीनुसार खताचा पुरवठा केला जातो. एम एच २६ बी ई ६९१९ या क्रमांकाचा १४ चक्का ट्रक १८-१८-१० हे खत घेऊन नांदेडहुन घाटंजीला जात होता,परंतु अकोला बाजार घाटंजी रोड वर असणार्‍या वळणावर साईड देताना ट्रक रोड खाली उतरला आणि पलटी झाला.

पुन्हा एकदा घाटंजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम चव्हाटय़ावर आल्याचे दिसून आले. एक महिन्यांपूर्वीच अकोला बाजार ते घाटंजी रोडचे काम करण्यात आले.या कामात मोठा गैरप्रकार झाला असून रोडच्या साईडला पीचअप व्यवस्थित न करता फक्त काळी माती आणि मुरुमाचा थर दिला आहे. त्यात भराव ना दगडाचा ना मुरुमाचा तसेच त्यावर रोलर न चालविता तशीच माती,मुरुम टाकली आहे. परिणामी रोड साईडला ट्रक उतरवताच पलटी झाला.सुदैवाने यात कोणतीच जिवितहानी झाली नाही.

Copyright ©