यवतमाळ राजकीय

भाजपाचे 100 सुपर वॉरियर्स हे विजयाचे शिलेदार – रामदास पाटील सुमठाणकर

भाजपाचे 100 सुपर वॉरियर्स हे विजयाचे शिलेदार – रामदास पाटील सुमठाणकर

उमरखेड : येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या महत्वाच्या बैठका पार पडत आहेत.त्यातील एक महत्वाची बैठक म्हणजे 100 सुपर वॉरियर्स बैठक.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याची जबाबदारी ही 100 सुपर वॉरियर्स यांच्या खांद्यावर असल्याने. पक्षात त्यांचं महत्वाचं स्थान आहे.

वॉरियर्स हा पक्षाचा आत्मा आहे. मतदार व पक्ष यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे.

वॉरियर्स नी आता निवडणूक वळणावर जाऊन काम केलं पाहिजे.भाजप सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती लोकांना देऊन त्यांना आपलं केलं पाहिजे.भाजप सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची महत्व पटवून देऊन जास्तीत जास्त लोकांना लाभ कसा घेता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे.आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून प्रत्येक बुथवर किती लोकांना योजनांचा लाभ मिळाला यांच्या नोंदी घेणे.पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहिती पुस्तकाचा अभ्यास करून वेगाने कामाला लागणे.गावं खेड्यातील लोकांपर्यंत कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविणे.पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगणे व पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे.

शेतकरी हिताच्या दृष्टीने मोदी सरकारने काय पावले उचलली आहेत उदा.PM किसान योजना,नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना,एक रुपयात पीक विमा योजना.ह्या सारख्या महत्वाच्या योजनांची माहिती देणे.तसेच केंद्र सरकारने नुकतीच घोषणा झालेली विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ केला आहे.ही योजना तळागाळातील सर्व घटकांना सामावून घेणारी असल्याने हीचा लाभ जास्तीत जास्त लोकांना कसा घेता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे.

भाजपाला जनाधार वाढवणे ही जबाबदारी वॉरियर्स ची आहे.यासाठी पक्षाचा विचार सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.आता सर्वांनी आळस झटकून कामाला लागले पाहिजे.वॉरियर्स नी प्रत्येक बूथवर प्रवास करून आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या पाहिजे. कोण सक्रिय आहे कोण पक्षात काम करण्यास तयार नाही किंवा एखादा नवीन कार्यकर्ता काम करण्यास इच्छूक असल्यास त्याला संधी देणे.

काल उमरखेड येथे पार पडलेल्या

वॉरियर्स बैठकीत मार्गदर्शन करताना रामदास पाटलांनी विचार मांडले. यावेळी प्रदेश उप अध्यक्ष गजानन घुगे आमदार नामदेव ससाणे महादेव सुपरे सुरेश वाघमारे रामराव वडकुते नितीन भुतडा जयश्री राठोड .

Copyright ©