यवतमाळ सामाजिक

आदर्श एज्युकेशन कॉलेज यवतमाळ येथील विद्यार्थ्यांची मातोश्री वृद्धाश्रमाला भेट 

आदर्श एज्युकेशन कॉलेज यवतमाळ येथील विद्यार्थ्यांची मातोश्री वृद्धाश्रमाला भेट 

स्थानिक आदर्श एज्युकेशन कॉलेज यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी दिनांक 20 /4/ 2024 वार शनिवार रोजी मातोश्री वृद्धाश्रम निळोणा येथे भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य रुद्रकुमार रामटेके यांच्या अनुमतीने या भेटीचे आयोजन करण्यात आले. अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. तेथील व्यवस्थापक श्री. निलेश मुळे यांच्याशी हितगुज करून वृद्ध व्यक्तींची माहिती विचारण्याचा प्रयत्न केला गेला .विद्यार्थ्यांनी खेळीमेळीचे वातावरण तयार करून वृद्ध व्यक्तींना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तसेच विद्यार्थ्यांनी वृद्ध व्यक्तींना भेटवस्तू दिल्या. या उपक्रमाला जवळपास सर्वच विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ निता राऊत, प्रा .डॉ.मनिषा क्षीरसागर ,प्रा. डॉ .उंबरकर ,प्रिया पारधी, कांचन भोकरे ,तेजस हात गावकर उपस्थित होते.

Copyright ©